Gold Smuggling: एअर इंडियाच्या केबिन क्रूला कोची विमानतळावर अटक; तब्बल 1487 ग्रॅम सोन्याची तस्करी केल्याचा आरोप

एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसून आले आहे की, शफीच्या हातावर पूर्ण बाहीच्या शर्टाखाली सोने टेपने बांधून लपवले होते.

Gold Smuggling

केरळमधील वायनाड येथील रहिवासी असलेल्या एअर इंडियाच्या केबिन क्रू शफीला 1,487 ग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी कोची विमानतळावर अटक करण्यात आली आहे. शफी हा बहारीन-कोझिकोड-कोची सेवेवर काम करत होता. सध्या त्याची चौकशी करण्यात येत आहे. सीमा शुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाने ही माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसून आले आहे की, शफीच्या हातावर पूर्ण बाहीच्या शर्टाखाली सोने टेपने बांधून लपवले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)