Mother Kills Son In Goa: चार वर्षाच्या मुलाची गोव्यात हत्या, सीईओ महिलेस अटक
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर महिला मुळची बंगळरु येथील असल्याची माहिती आहे. तिने गोवा येथे मुलाची हत्या केली आणि ती पुन्हा कर्नाटकला परतली.
सीईओ असलेल्या एका 39 वर्षीय महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर महिला मुळची बंगळरु येथील असल्याची माहिती आहे. तिने गोवा येथे मुलाची हत्या केली आणि ती पुन्हा कर्नाटकला परतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील एका अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या करणारी महिला स्टार्टअपची संस्थापक असल्याची माहिती आहे. तिने मृतदेह वाहून नेण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली. बाळाचा मृतदेह बॅगेत ठेवला आणि ही बॅग गोव्यात ठेऊन तिने पलायन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सीईओला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर महिला उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील एका अपार्टमेंटमध्ये राहिली. त्या घरात घरात रक्ताचे डाग दिसत असल्याचे त्यांनी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)