Girl Dies After Eating Shawarma: तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल, तपास सुरु
यानंतर सर्वजण जवळच्या खाजगी रुग्णालयात गेले.
तामिळनाडूच्या नमक्कल शहरातील एका हॉटेलमधून विकत घेतलेला चिकन शोरमा खाल्ल्याने सोमवारी इयत्ता 9 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. नमक्कल शहरातील एएस पेट्टाई येथील डी कलाईरासी असे मृत मुलीचे नाव आहे. कलाईरासी, तिचे वडील धवकुमार, आई सुजाता, भाऊ बुपती, काका सिनोज आणि काकू कविता असे सार्वजन 16 सप्टेंबरच्या रात्री बाहेर गेले होते. नंतर त्यांनी एका हॉटेलमधून शोरमाचे पार्सल आणि इतर काही खाद्यपदार्थ विकत घेतले. घरी आल्यानंतर शोरमा खाल्ल्यानंतर कलाईरासी आणि इतरांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. यानंतर सर्वजण जवळच्या खाजगी रुग्णालयात गेले. सोमवारी उपचारादरम्यान कलाईरासी हिचा मृत्यू झाला. नमक्कल टाउन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या हॉटेलमधील शोरमा खाल्ल्याने त्याच रात्री मेडिकल कॉलेजच्या 13 विद्यार्थ्यांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केल्याची माहिती मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)