Ganapati Poojan: पीएम नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश DY Chandrachud यांच्या घरी गणपती पूजनाला लावली हजेरी; स्वतः केली आरती (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गणेश पूजेला हजेरी लावली.

PM Narendra Modi Attends Ganapati Poojan at CJI DY Chandrachud’s House (Photo Credits: X/@ians_india)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गणेश पूजेला हजेरी लावली. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान सरन्यायाधीश आणि त्यांची पत्नी कल्पना दास यांच्यासह बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान स्वतः गणपतीची आरती करताना दिसले. व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजेमध्ये पारंपारिक मराठी टोपी परिधान करताना दिसत आहेत. दरम्यान. डीवाय चंद्रचूड यांचा जन्म मुंबईत देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. शिक्षणानंतर त्यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये नाव नोंदवले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही वकिली केली. चंद्रचूड यांनी मुंबई विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. (हेही वाचा: Rishi Panchami 2024: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती च्या दरबारात 42,000 महिलांकडून आरती संपन्न; India World Record कडून दखल)

PM Narendra Modi Attends Ganpati Poojan at Residence of DY Chandrachud-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)