Food Poisoing in Belagavi: बेळगाव मध्ये भिरेश्वर आणि करेम्मा देवीची जत्रेत प्रसादामधून विषबाधा; 5 जणांची प्रकृती चिंताग्रस्त

आजारी पडलेल्यांना तात्काळ सावदत्ती सार्वजनिक रुग्णालय व बेळगावी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच जण गंभीर आहेत त्यांना धारवाड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

कर्नाटकात बेळगाव मध्ये भिरेश्वर आणि करेम्मा देवीची जत्रेत प्रसादामधून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आहे. प्रसाद खाल्ल्यानंतर काही भाविकांची तब्येत बिघडली आहे. ही घटना सावदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावच्या जत्रेतील आहे. यामध्ये 5 जणांची प्रकृती गंभीर आहे तर 46 जणांना प्रसाद खाल्यानंतर त्रास झाल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. आजारी पडलेल्यांना तात्काळ सावदत्ती सार्वजनिक रुग्णालय व बेळगावी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच जण गंभीर आहेत त्यांना धारवाड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement