Haryana Flash Flood: हरीयाणामध्ये नदीला महापूर, पंचकुला येथे वाहने पाण्यात अडकली, नागरिकांचीही गैरसोय

खारक मांगोली परिसरात एक महिला नदीकाठी आपली कार पार्क करत होती. अचानक पूर आला आणि कार महिलेसह नदीत पडली.

Haryana Flash Flood

हरियाणातील पंचकुलामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक चालकासह कार वाहून गेली. हरियाणातील पंचकुलामध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली. स्थानिक लोकांनी मोठ्या प्रयत्नानंतर महिलेला वाचवले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकुलामध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. खारक मांगोली परिसरात एक महिला नदीकाठी आपली कार पार्क करत होती. अचानक पूर आला आणि कार महिलेसह नदीत पडली.

रविवारी मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागल्याने घग्गर नदीच्या काठावर उभी असलेली कार वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, पंचकुलातील खरक मांगोली येथे एका महिलेने तिची कार नदीच्या काठावर उभी केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने कार नदीत वाहून गेली. महिलेची सुटका करून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement