Farmer's Protest: दिल्लीत शेतकरी आंदोलन संपल्याची Gurnam Singh Charuni यांची घोषणा; सरकारने 'शब्द' न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
शेतकरी आंदोलनाची जागा 11 डिसेंबरला रिकामी करणार असल्याची माहिती देखील शेतकरी नेत्यांनी दिली आहे.
दिल्लीत मागील 378 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अखेर आज संपलं आहे. हे आंदोलन संपल्याची घोषणा Gurnam Singh Charuni यांनी केली आहे. 15 जानेवारीला रिव्ह्यू मिटिंग होणार असून सरकारने 'शब्द' न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान आंदोलक शेतकर्यांना सरकार कडून एक पत्र देण्यात आले आहे ज्यामध्ये MSP वर एक कमिटी बनवत असल्याची तसंच शेतकर्यांवरील केसेस मागे घेत असल्याचं सांगण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलन संपलं
आंदोलक शेतकर्यांना पत्र
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)