Family Performs ‘Statue’ Wedding: प्रेमी युगुलाने वर्षभरापूर्वीच कवटाळले होते मृत्यूला; आता कुटुंबीयांनी त्यांचे पुतळे बनवून लावले लग्न (Watch Video)
दोन्ही मुलांच्या मृत्युनंतर कुटुंबांनी त्यांचे पुतळे बनवले आणि त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर पूर्ण विधी करून दोन्ही पुतळ्यांचे लग्न लावले.
गुजरातमधील तापी जिल्ह्यात लग्नाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. गतवर्षी इथल्या निझर तालुक्यातील नेवाळा गावातील एका जोडप्याला लग्न करायचे होते, मात्र कुटुंबाचा त्यांच्या नात्याला विरोध होता. यामुळे दोघांनी आत्महत्या केली होती. आता या घटनेला एक वर्ष उलटल्यानंतर कुटुंबीयांना त्यांची चूक कळली आहे. मुलांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे नाते स्वीकारले आणि या जोडप्याच्या पुतळ्यांची लग्ने लावली.
दोन्ही मुलांच्या मृत्युनंतर कुटुंबांनी त्यांचे पुतळे बनवले आणि त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर पूर्ण विधी करून दोन्ही पुतळ्यांचे लग्न लावले. आता फक्त स्थानिक लोकांमध्येच नाही तर इंटरनेटवरही या खास लग्नाची बरीच चर्चा आहे. अशाप्रकारे गणेश आणि रंजना यांची प्रेमकहाणी आता एक उदाहरण बनली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)