Encounter in Punjab: पंजाबमध्ये पोलिसाच्या सोबतच्या चकमकीत गँगस्टर तरनजीत सिंग ठार
या चकमकीनंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. बंदुकीची काडतुसे जमिनीवर पडली असून पोलिसांची शोधमोहीम सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पंजाबमधील जिरकपूरमधील पीरमुचल्ला येथे पोलिस आणि गुंडामध्ये चकमक झाली आहे. गँगस्टर तरनजीत सिंग उर्फ जस्सा हैबोवालिया याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. जिथे पोलिस आणि गुंडामध्ये चकमक झाली. पोलिसांनी ती जागा ताब्यात घेऊन शोधमोहीम सुरू केली. अँटी गँगस्टर टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. या चकमकीनंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. बंदुकीची काडतुसे जमिनीवर पडली असून पोलिसांची शोधमोहीम सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)