Empty Train Coaches Caught Fire: ट्रेनच्या रिकाम्या डब्यांना आग, तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील घटना (Watch Video)

डबे रिकामेच असल्याने आणि रेल्वे उभी असल्याने अग्निशम दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्यामुळे आगीवर पुढच्या काहीच क्षणात नियंत्रण मिळवता आले.

Railway Nilayam

तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील रेल्वे ओव्हरब्रिजवर गुरुवारी रेल्वेच्या रिकाम्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली. डबे रिकामेच असल्याने आणि रेल्वे उभी असल्याने अग्निशम दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्यामुळे आगीवर पुढच्या काहीच क्षणात नियंत्रण मिळवता आले. या घटनेदरम्यान कोणीही जखमी झाले नाही किंवा मृत्यूचीही कोणती घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर सामायिक केला आहे. (हेही वाचा, Fact Check: 'नवी दिल्ली रेल्वे स्टेशन कधीही बंद होणार नाही', PIB चे फेक न्यूजवर स्पष्टीकरण)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)