Rahul Gandhi यांनी PM Modi यांचा उल्लेख 'पनौती' केल्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस; 25 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास मुदत

मोदींबाबत उच्चारलेल्या दोन शब्दांच्या बाबत आता खुलासा करण्यासाठी राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस आली असून त्यांना 25 नोव्हेंबर पर्यंत त्यासाठी वेळ दिली आहे.

Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

निवडणूक प्रचारादरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी थेट नाव घेता पंतप्रधानांना लक्ष्य केले होते. त्यांचा उल्लेख 'पनौती' आणि पाकिटमार असा केल्याने आता राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहे. मोदींबाबत उच्चारलेल्या या दोन शब्दांच्या बाबत आता खुलासा करण्यासाठी राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस आली असून त्यांना 25 नोव्हेंबर पर्यंत त्यासाठी वेळ दिली आहे. दरम्यान वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याच्या पराभवावर बोलताना त्यांनी 'पनौती' शब्दाचा उल्लेख केला होता. Rahul Gandhi Panauti Remark: खेळाडूंनी विश्वचषक जिंकला असता, पण 'पनौती'ने आम्हाला हरवले... राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर टोला, पाहा व्हिडिओ.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)