Edible Oil Prices: मदर डेअरीने कमी केली 'Dhara' तेलाची किंमत, जाणून घ्या नवे दर

मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, धारा खाद्यतेलाची एमआरपी विविध प्रकारांमध्ये 15-20 रुपये प्रति लिटरने तात्काळ प्रभावाने कमी केली जात आहे.

Edible oil | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मदर डेअरीने धारा ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्‍या खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत (MRP) तत्काळ प्रभावाने मोठी कपात केली आहे. आता त्यांची किंमत 15 ते 20 रुपयांनी कमी झाली आहे. कमी किंमत असलेला स्टॉक पुढील आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे. अन्न मंत्रालयाने खाद्यतेल उद्योग संस्था SEA ला स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमतीध्ये सुधारणा करण्याच्या आवश्यकतेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, धारा खाद्यतेलाची एमआरपी विविध प्रकारांमध्ये 15-20 रुपये प्रति लिटरने तात्काळ प्रभावाने कमी केली जात आहे.

धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (एक लिटर पॅक) किंमत 170 रुपयांवरून 150 रुपयांवर आली आहे. धारा रिफाइन्ड राइस ब्रानची किंमत 190 रुपयांवरून 170 रुपये प्रति लिटरवर आली आहे. धारा शुद्ध सूर्यफूल तेलाची किंमत 175 रुपयांवरून 160 रुपये प्रति लिटरवर आली आहे. शेंगदाणा तेलाचे दर 255 रुपयांवरून 240 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. (हेही वाचा: एप्रिल महिन्यात वाहन विक्री चार टक्क्यांनी घटली, दुचाकींचा ग्राहकांसाठी संघर्ष सुरुच, FADA द्वारा आकडेवारी जाहीर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now