Loksabha Election 2024: हेमा मालिनींच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणुकीच्या प्रचाराला महिलांच्या अनादराचे व्यासपीठ बनू दिले जाऊ शकत नाही, याचा पुनरुच्चार आयोगाने केला आहे.
भाजप नेत्या हेमा मालिनी यांच्या विरोधात केलेल्या टिप्पण्यांसाठी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना नोटीस बजावली. त्यांच्याकडून 11 एप्रिल 2024 रोजी उत्तर मागितले आहे. पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांद्वारे महिलांबद्दल आदरयुक्त सार्वजनिक संभाषण सुनिश्चित करण्यासाठी ECI ने INC अध्यक्षांकडून कारवाईची मागणी केली आहे; निवडणुकीच्या प्रचाराला महिलांच्या अनादराचे व्यासपीठ बनू दिले जाऊ शकत नाही, याचा पुनरुच्चार आयोगाने केला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)