EC Notice To Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाने बजावली कारणे दाखवा नोटीस; PM Narendra Modi यांच्याबद्दल केली होती टिपण्णी

भाजपने प्रियंका यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एका दिवसानंतर आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

Priyanka Gandhi (Photo Credit - PTI)

निवडणूक आयोगाने (EC) काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांना आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. गुरुवारी आयोगाने प्रियांका यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजपने प्रियंका यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एका दिवसानंतर आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. बुधवारी, भारतीय जनता पक्षाने प्रियंका यांच्यावर राजस्थानमधील निवडणूक प्रचारादरम्यान खोटे दावे करण्यासाठी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धांचा उल्लेख' केल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. (हेही वाचा: ED summons Vaibhav Gehlot: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा वैभव यांना ईडीचे समन्स)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)