Earthquake In Telangana: तेलंगणामध्ये 5.3 तीव्रतेचा भूकंप; हैद्राबादमध्येही जाणवले धक्के
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पडले. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. अधिकारी परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.
Earthquake In Telangana: तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात बुधवारी सकाळी 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी 7.27 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हैदराबादमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पडले. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. अधिकारी परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. रहिवाशांना भूकंपाच्या वेळी सतर्क राहण्याचा आणि गर्दीच्या किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
तेलंगणामध्ये 5.3 तीव्रतेचा भूकंप -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)