Manipur Earthquake: मणिपूर 4.0 रिश्टर स्केल भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले

मणिपूर भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय प्रदेशात स्थित आहे आणि यापूर्वी अनेक भूकंप अनुभवले आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

मणिपूर येथे आज 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:23 वाजता 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू 61 किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के मणिपूरच्या इतर अनेक भागात तसेच शेजारील नागालँड, आसाम आणि मिझोराम या राज्यांमध्येही जाणवले.

मणिपूर भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय प्रदेशात स्थित आहे आणि यापूर्वी अनेक भूकंप अनुभवले आहेत. मणिपूरमध्ये सर्वात अलीकडील मोठा भूकंप 4 जानेवारी 2016 रोजी 6.7 रिश्टर स्केलचा होता. त्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)