Earthquake in Delhi: दिल्ली एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के; तीन दिवसांत दुसरी घटना

दिल्लीशिवाय उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दुपारी 4:18 वाजता भूकंप झाला.

Earthquake

आज दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तीन दिवसांत भूकंपाची ही दुसरी वेळ आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.6 इतकी मोजली गेली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले. दिल्लीशिवाय उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दुपारी 4:18 वाजता भूकंप झाला. (हेही वाचा: दिल्ली सरकारचा प्रदूषणावर महत्त्वपूर्ण निर्णय! आता राजधानीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर कालावधीत लागू होणार ऑड-इव्हन फॉर्म्यूला)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement