Delhi News: मद्यधुंद तरूणाचा निर्लजपणा, वृध्द जोडप्यांच्या अंगावर केली लघवी, दिल्लीतील क्रांती एस्क्प्रेसमधील घटना
दिल्लीत क्रांती एस्क्प्रेसमध्ये एक किसळवाना प्रकार उघडकीस आला आहे. एका मद्यधुंद असलेल्या तरूणाने एका वृध्द जोडप्यांवर लघवी केली.
Delhi News: दिल्लीत क्रांती एस्क्प्रेसमध्ये एक किसळवाना प्रकार उघडकीस आला आहे. एका मद्यधुंद असलेल्या तरूणाने एका वृध्द जोडप्यांवर लघवी केली. या घटनेमुळे रेल्वेत बऱ्याच वेळ गोंधळ सुरु होता. या घटनेअंतर्गत आरोपी तरुणाला अटक करण्यात आली होती परंतु त्याला जामिनीवर सुटका मिळाला आहे. वृध्द जोडप्यांच्या आणि त्याच्या सामानावर लघवी केल्याने त्यांना अपमान सहन करावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार 19 वर्षाचा तरुणाने असा निर्लजपणा केला आहे.बुधवारी (४ ऑक्टोबर) रात्री दिल्लीकडे जाणारी ट्रेन विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शनकडे जात असताना ही घटना घडली. रितेश असं या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Another peegate: Drunk passenger urinates on senior citizens onboard train in #UttarPradesh
https://t.co/nYyNSNZBNR https://t.co/fMz3vmPtlC
— Arvind Chauhan 💮🛡️ (@Arv_Ind_Chauhan) October 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)