Dr SS Badrinath Passes Away: Sankara Nethralaya चे संस्थापक डॉ. एस एस बद्रीनाथ यांचे निधन; PM Narendra Modi यांनी अर्पण केली आदरांजली
एस एस बद्रीनाथ आजारी होते या आजारपणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Sankara Nethralaya चे संस्थापक डॉ. एस एस बद्रीनाथ यांचे आज (21 नोव्हेंबर) वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. PM Narendra Modi यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून डॉ. एस एस बद्रीनाथ आजारी होते या आजारपणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर बद्रीनाथ यांनी परदेशात अभ्यास आणि संशोधन पूर्ण केल्यानंतर 1978 मध्ये चेन्नईतील शंकर नेत्रालय या भारतातील सर्वात मोठ्या धर्मादाय नेत्रालय संस्थेची स्थापना केली. 24 फेब्रुवारी 1940 रोजी जन्मलेल्या डॉ.बद्रीनाथ यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. S Venkitaramanan Passes Away: RBI चे माजी गव्हर्नर एस वेंकटरामनन यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)