Dowry Death Charges Against Live-In Partner: 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही दाखल होऊ शकतो हुंडाबळीचा गुन्हा'; Allahabad High Court चा मोठा निर्णय
प्रियकराच्या या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, ती ट्रायल कोर्टाने फेटाळली होती.
लिव्ह इन रिलेशनशिपच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर पती-पत्नी सारखे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील तर, त्यांच्यावरही हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. पती-पत्नीसारखे लिव्ह इनमध्ये राहेन हा हुंडाबळीसाठी पुरेसा आधार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आदर्श यादव यांची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे नमूद केले आहे. आदर्श यादव याच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली प्रयागराज पोलीस ठाण्यात याचिकाकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिव्ह इन प्रेयसीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, ती ट्रायल कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च कोर्टात धाव घेतली. आपण तिचा नवरा नाही, त्यामुळे आपल्यावर हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाने आदर्श यादवची याचिका फेटाळत म्हटले की, मृत व्यक्ती कायदेशीररित्या विवाहित पत्नी नव्हती, परंतु पुराव्यावरून असे दिसून येते की दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते, त्यामुळे या प्रकरणात हुंडा मृत्यूच्या तरतुदी लागू होतात. (हेही वाचा: Allahabad High Court: ‘खोट्या आरोपात वैवाहिक नाते आबाधित ठेवण्याची कोणत्याच जोडीदाराची इच्छा नसते’, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे घटस्फोटाच्या याचिकेवर निरीक्षण)
Dowry Death Charges Against Live-In Partner-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)