Dog Attack in Hyderabad Video: भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर प्राणघातक हल्ला; CCTV मध्ये कैद झाली भीषण घटना (Watch)
सुदैवाने, जवळची एक महिला मुलाच्या बचावासाठी येते, मात्र कुत्रा महिलेवरही हल्ला करतो. त्याच वेळी रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती कुत्र्याला दगडाने पळवून लावते.
हैदराबादच्या तप्पाचबुतरा (Tappachabutra) येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी, 8 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. सध्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक लहान मूल रस्त्यावरून चालत आहे. यावेळी हातात धरलेल्या खेळण्याशी खेळण्यात तो मग्न आहे. अचानक रस्ता ओलांडणारा कुत्रा या मुलावर हल्ला करतो. त्यानंतर मुलगा जमिनीवर कोसळतो मात्र तरीही कुत्रा त्याला सोडत नाही. सुदैवाने, जवळची एक महिला मुलाच्या बचावासाठी येते, मात्र कुत्रा महिलेवरही हल्ला करतो. त्याच वेळी रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती कुत्र्याला दगडाने पळवून लावते. या हल्ल्यात मुलगा इतका जखमी झाला आहे की, अहवालानुसार, मुलावर शस्त्रक्रिया करावी लागेल, ज्यासाठी त्याच्या पालकांना 3 लाख रुपये खर्च आहे. (हेही वाचा: Stunt Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाची स्टंडबाजी, स्टेशन येण्यापुर्वीच उतरला;व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)