Direct Tax Collection Data: प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 15.73 टक्क्यांनी वाढ; चालू आर्थिक वर्षात 6.53 लाख कोटी रुपयांवर पोहोचले

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनाच्या तात्पुरत्या आकडेवारीत सातत्याने वाढ झाली आहे.

Money. Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 15.73 टक्क्यांनी वाढून 6.53 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परतावा समायोजित केल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5.84 लाख कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 17.33 टक्के जास्त आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनाच्या तात्पुरत्या आकडेवारीत सातत्याने वाढ झाली आहे. हे संकलन चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 32.03 टक्के आहे. 10 ऑगस्टपर्यंत 69,000 कोटी रुपयांचे रिफंड जारी करण्यात आले आहेत.जे मागील वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत 3.73 टक्क्यांनी जास्त आहे. (हेही वाचा: PM Modi's Tip To Investors: पीएम मोदींनी दिला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मंत्र, म्हणाले- 'सरकारी कंपन्यांत करा गुंतवणूक')

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement