Delhi: गांधीनगर बाजारात विकले जात होते शिखांचे धार्मिक चिन्ह असलेले महिलांचे अंतर्वस्त्र; स्थानिक लोकांनी केला विरोध (Watch Video)
दुकानदाराविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुकानदाराच्या या कृतीमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून आरोपी दुकानदाराला अटक करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील सर्वात मोठ्या रेडिमेड कापड बाजारांपैकी एक असलेल्या गांधीनगर टेक्सटाईल मार्केटमधील एका दुकानात महिलांच्या अंतर्वस्त्रांवर शिख चिन्ह (खांडा साहिब) हे धार्मिक चिन्ह छापलेले कपडे विकल्याची घटना समोर आली आहे. शीख समाजाच्या लोकांनी याचा निषेध केला आहे. दुकानदाराविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुकानदाराच्या या कृतीमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून आरोपी दुकानदाराला अटक करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदार जगदीप सिंग यांनी सांगितले की, 25 नोव्हेंबर रोजी ते सुभाष रोड, गांधीनगर मार्केट येथे गेले होते. तिथे त्यांची नजर एका दुकानावर पडली जिथे महिलांच्या अंतर्वस्त्रांवर शीख धर्माचे प्रतीक असलेल्या खांडाचे चित्र छापलेले होते. जगदीप यानीन सांगितले की, जेव्हा त्यांनी दुकानदाराला याबाबत विचारणा केली असता, त्याने ते कारखान्यातून मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर जगदीप यांनी आरोपी दुकानदाराविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Sabarimala Temple: शबरीमला यात्रेकरूंना दिले जाते होते टॉयलेटच्या पाण्यात तयार केलेले अन्न; अयप्पा सेवा संघाने रंगेहात पकडले)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)