Delhi Schools Shut Due To Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा 2 दिवस बंद; CM Arvind Kejriwal यांची घोषणा

दिल्लीतील प्रदूषणाची वाढती पातळी पाहता, पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावली असून त्यामध्ये GRAP-3 च्या काटेकोर अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे.

Delhi Pollution (PC - PTI)

राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा पुढील 2 दिवस बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. प्रदूषण नियंत्रण समितीने शाळा बंद ठेवण्याची शिफारस केली होती. राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषणाची पातळी 'गंभीर' श्रेणीच्या जवळ आली असल्याने, केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण समितीने गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये अत्यावश्यक नसलेल्या बांधकामांवर बंदी घातली. दिल्लीतील प्रदूषणाची वाढती पातळी पाहता, पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावली असून त्यामध्ये GRAP-3 च्या काटेकोर अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेप-3 निर्बंध लागू करण्यात आले आहेत, ज्यामुळे अत्यावश्यक सरकारी प्रकल्प, खाणकाम आणि दगड तोडणे वगळता बांधकाम आणि पाडण्याचे काम पूर्णपणे थांबवले जाईल. (हेही वाचा: BEST Decision On Mumbai AQI: मुंबई शहरातील हवेच्या ढासळेल्या गुणवत्तेवर शुद्धीकरणाचा उतारा; 'बेस्ट' निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)