Delhi Rape Case: दिल्लीत 'टॅरो कार्ड रीडर'चा महिलेवर बलात्कार; आरोपीला हिमाचल प्रदेशमधून अटक

महिलेने 1 मार्च रोजी पोलिसांना सांगितले की, सिद्धांत जोशीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arrest (PC -Pixabay)

Delhi Rape Case: गेल्या वर्षी दिल्लीत एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 35 वर्षीय 'टॅरो कार्ड रीडर'ला हिमाचल प्रदेशमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. सिद्धांत जोशी असे आरोपीचे नाव आहे. महिलेने 1 मार्च रोजी पोलिसांना सांगितले की, सिद्धांत जोशीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त (दक्षिण-पश्चिम) रोहित मीना यांनी सांगितले की, पीडित महिलेने असा दावाही केला आहे की, आरोपी सिद्धांत जोशीने महिलेचे प्रायव्हेट फोटो काढले आणि तिला धमकावण्यासाठी व्हिडिओ बनवले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून, अगदी उत्तर प्रदेशपासून उत्तराखंड आणि पंजाबपर्यंत त्याचा तपास करण्यात आला. आरोपीच्या मोबाईल फोनच्या मॉनिटरिंगच्या आधारे, टीमने त्याला हिमाचल प्रदेशातील कसौली येथून अटक केली. (हेही वाचा: Buxar Horror: तरुणीने प्रियकराला घरी बोलावून कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट; तरुणाला तसेच मृतावस्थेत सोडून काढला पळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)