Delhi Rape Case: चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन बलात्कार, दिल्ली पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे आरोपीस अटक

या घटनेतील आरोपी चिमुकलीचे अपहरण करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार (Delhi Rape Case) केल्याची खळबळजनक घटना दिल्ली येथे उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपी चिमुकलीचे अपहरण करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला आणि तिला एका उद्यानाजवळ सोडून देण्यात आले, असा आरोप आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनिल पाठक असे आरोपीचे नाव असल्याचे पुढे आले.

दरम्यान, पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. रुग्णालयात तिची जीवनमरणाची लढाई सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्य-उत्तर दिल्ली येथील भालस्वा डेअरी परिसरात सदर घटनेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, अनिल पाठक याने एका मजूराची मुलगी घराबाहेर खेळत होती. ती खेळत असलेल्या घराबाहेरून तिचे अपहरण केले. (हेही वाचा, Gang Rape in Palghar: सोळा वर्षीय मुलीवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार; 8 जणांना अटक, पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील घटना)

पीडितेचे आई-वडील घरी परतले तेव्हा त्यांना चिमुकली आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. दरम्यान, चिमुकली दुसऱ्या दिवशी पहाटे परिसरातील एका उद्यानाजवळ आढळून आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली होती. तिचे छायाचित्र इतर पोलीस ठाण्यांनाही शेअर केले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत परिसरातील सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये आरोपी मुलीला हातात घेऊन जात असल्याचे दिसून आले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अपहरण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली महिला आयोगाने (DCW) देखील याप्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)