Cops, Locals Clash In Delhi: पोलीस आणि स्थानिक यांच्यात हाणामारी; दिल्लीयेथील राजोरी गार्डन-टिळक नगर परिसरातील घटना (Watch Video)
राजधानी दिल्ली येथील पीएस राजौरी गार्डन आणि टिळक नगरच्या सीमेवरील भागात दिल्ली पोलिस आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मोहन गार्डन पोलीस स्टेशनचे पथक एका आरोपीच्या शोधार्थ या परिसरात आले होते तेव्हा स्थानिकांसी त्यांचा संघर्ष झाला.
राजधानी दिल्ली येथील पीएस राजौरी गार्डन आणि टिळक नगरच्या सीमेवरील भागात दिल्ली पोलिस आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मोहन गार्डन पोलीस स्टेशनचे पथक एका आरोपीच्या शोधार्थ या परिसरात आले होते तेव्हा स्थानिकांसी त्यांचा संघर्ष झाला. यातून आक्रमक झालेल्या स्थानिकांनी पोलिसांवर हल्ला केला असे समजते. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत एक व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये स्थानिक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये पोलीस जमावाला नियंत्रित आणताना आणि शांततेचे अवाहन करताना दिसत आहेत. मात्र, जमाव मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचेही व्हिडिओत पाहयला मिळते.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)