Delhi: राजधानी दिल्लीमध्ये 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश

राष्ट्रीय राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश

Firecrackers (Photo Credits: IANS)

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (डीपीसीसी) मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, अनेक तज्ज्ञांनी सूचित केले आहे की, लोक मोठ्या संख्येने फटाके फोडून उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतील, ज्यामुळे कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लोकांच्या एकत्र येण्याने केवळ नियमांचेच उल्लंघन होणार नाही, तर वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे दिल्लीमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)