Delhi Man Masturbating Outside Girls Hostel Videos: मुलींच्या पीजी बिल्डिंगबाहेर व्यक्तीने केले हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल, DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी पोलिसांकडे मागितला कारवाईचा अहवाल

मालीवाल म्हणतात, या प्रकरणी एफआयआर जारी करून या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, जेणेकरून असे गुन्हे करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल.

Delhi Man Masturbating Outside Girls Hostel Videos

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सोमवारी ट्विटरवर एक पुरुष दिल्लीतील मुलींच्या पेइंग गेस्टबाहेर हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. मुलींच्या वसतिगृहाबाहेर हस्तमैथुन करणाऱ्या पुरुषाचे दोन व्हिडिओ शेअर करताना स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘गर्ल्स पीजीच्या बाहेर रात्री रस्त्यावर उभे राहून एक मुलगा हस्तमैथुन करतो अशा दोन तक्रारी आम्हाला मिळाल्या. दोन्ही व्हिडिओ एकाच व्यक्तीचे असल्याचे दिसत आहे. याबाबत दिल्ली पोलिसांना हजेरीचे समन्स बजावले आणि कारवाईचा अहवाल मागवला. ही बाब अत्यंत गंभीर आहे.’ स्वाती मालीवाल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये दिल्लीतील मुलींच्या पीजी इमारतीजवळ एक तरुण हस्तमैथुन करताना दिसत आहे. ही घटना 12 जून रोजी मध्यरात्री घडली. मालीवाल म्हणतात, या प्रकरणी एफआयआर जारी करून या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, जेणेकरून असे गुन्हे करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. (हेही वाचा: Uttarpradesh Sexual Abuse Case: सहारनपूर येथे बालसुधारगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार; ह्या संदर्भात 5 कर्मचाऱ्यांना बडतर्फ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)