Delhi Shoe Factory Fire Video: दिल्लीच्या उद्योग नगरमधील बुटांच्या कारखान्याला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देशाची राजधानी दिल्लीतील उद्योग नगर येथील बुटांच्या कारखान्यात भीषण आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली, यामागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण आग खूप भीषण आहे. कारण व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळा उठत असल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)