Delhi Saket Court Firing: साकेत कोर्टातील गोळीबारावरुन अरविंद केजरीवालांची केंद्र सरकारवर टिका
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.
दिल्लीतील साकेत येथील न्यायालयात पहाटे साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेवर गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, साकेत कोर्टात महिलेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)