Air Akasa: दिल्ली-गोवा फ्लाइट दरम्यान पाळीव कुत्र्याचा पिंजरा उघडल्याने प्रवाशांमध्ये घबराट, महिलेविरुद्ध तक्रार दाखल

प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पहायला मिळाली. या कुत्र्यांने प्रवाशांकडे पाहुन जोरात भुंकायला सुरुवात केली होती.

Akasa Airlines (PC - Wikimedia Commons)

एअर अकासा दिल्ली-गोवा फ्लाइट दरम्यान एका महिलेने तिच्या पाळीव प्राण्याचा पिंजरा उघडून प्रवाशांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी दिल्लीस्थित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीशा अधना नावाच्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. या महिलेने तिच्या गोंगाट करणाऱ्या कुत्र्याला शांत करण्यासाठी तिचा पाळीव प्राण्याचा पिंजरा उघडला. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पहायला मिळाली. या कुत्र्यांने प्रवाशांकडे पाहुन जोरात भुंकायला सुरुवात केली होती.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now