Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये BJP आघाडीवर; पक्षाच्या मुख्यालयात जल्लोष व उत्सवाची तयारी सुरु (Video)
विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर असल्याने पक्षाच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप कार्यालयात मिठाई येण्यास सुरुवात झाली आहे, पक्षाने उत्सवाची तयारी सुरू केली आहे.
सध्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालाची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीचे ट्रेंड हे एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाहीत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालावरून, दिल्लीत सत्ता उलटताना दिसत आहे. भाजपने आघाडीच्या बाबतीत बहुमताचा आकडा ओलांडला आहे. भाजप सध्या 40 जागांवर आघाडीवर आहे, तर अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप सध्या 30 जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेस सकाळी एका जागेवर आघाडीवर होता ,मात्र आता ती जागाही त्यांच्या हातातून निसटल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात निकराची लढत दिसून येत आहे. जर या सध्याच्या ट्रेंडचे निकालांमध्ये रूपांतर झाले तर, याचा अर्थ असा की भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता स्थापन करेल, आणि ही बाब अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का असेल.
दुसरीकडे, विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर असल्याने पक्षाच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप कार्यालयात मिठाई येण्यास सुरुवात झाली आहे, पक्षाने उत्सवाची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुका झाल्या. आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी सुरू आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संदीप दीक्षित आणि प्रवेश वर्मा यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कडक सुरक्षेत सर्व जागांवर मतमोजणी सुरू आहे. एक्झिट पोलने दिल्लीत भाजपचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. (हेही वाचा: Milkipur By-Election Result 2025: दिल्ली पाठोपाठ यूपी विधानसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू, भाजप आणि सपामध्ये लढत)
Delhi Assembly Election Result 2025:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)