Cyber Attacks India: गेल्या वर्षी संपूर्ण आशिया खंडात भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले; जाणून घ्या धक्कादायक अहवाल

सायबर सिक्युरिटी फर्म CloudSEEK च्या आकडेवारीनुसार, आशिया-पॅसिफिक क्षेत्राला लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत 26.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये, हॅकर्सनी आशियामध्ये भारतावर सर्वाधिक सायबर हल्ले केले आहेत. सायबर हल्ल्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर (अमेरिकेनंतर) भारताचा दुसरा क्रमांक आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी भारतात सायबर हल्ल्यांचे प्रमाण 24.3 टक्क्यांनी वाढले आहे. 2021 मध्ये 20.4 टक्के अधिक आणि 2022 मध्ये 24.1 टक्के अधिक हल्ल्यांसह आशिया-पॅसिफिक हे जागतिक स्तरावर सर्वाधिक लक्ष्यित क्षेत्र राहिले.

सायबर सिक्युरिटी फर्म CloudSEEK च्या आकडेवारीनुसार, आशिया-पॅसिफिक क्षेत्राला लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत 26.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 आणि 2022 मध्ये उत्तर अमेरिका, आशिया-पॅसिफिक आणि युरोप हे सर्वाधिक लक्ष्यित प्रदेश आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now