CPI नेते Kanhaiya Kumar आणि आमदार Jignesh Mewani यांचा राहुल गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आज भगतसिंग यांच्या जयंतीदिनी सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Kanhaiya Kumar and Jignesh Mevani (File Photos)

आज भगतसिंग यांच्या जयंतीदिनी सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेलही उपस्थित होते. काँग्रेसमध्ये कन्हैया आणि जिग्नेशची भूमिका काय असेल याबाबत चित्र स्पष्ट नाही. मात्र, असे सांगितले जात आहे की, दोन्ही युवा नेते तरुणांना काँग्रेस जोडणे आणि मोदी सरकारच्या विरोधातील आंदोलनांशी जोडण्यासाठी मोहीम सुरू करू शकतात. बिहारमध्ये कन्हैया आणि गुजरातमध्ये जिग्नेश यांना काँग्रेस मोठे पद देऊ शकते अशीही चर्चा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now