Coronavirus Updates: भारतात कोरोना व्हायरस संसर्गाचे 3,325 नवे संक्रमित; देशभरात सक्रीय रुग्णसंख्येचा आकडा 44,175 वर

वैद्यकीय उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आज (मंगळवार, 2 मे 2023) सक्रीय रुग्णसंख्या 47,246 वरून 44,175 पर्यंत घसरली आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोनाव्हायरस (Covid-19) सक्रीय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आज (मंगळवार, 2 मे 2023) सक्रीय रुग्णसंख्या 47,246 वरून 44,175 पर्यंत घसरली आहे. कोविड रुग्णंची संख्या 4.49 कोटी (4,49,52,996) इतकी नोंदवली गेली आहे. हे प्रमाण आता एकूण संक्रमणांपैकी 0.11 टक्के आहे. राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर 98.71 टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,77,257 वर पोहोचली आहे तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif