Congress Worker Hugs Rahul Gandhi: कॉंग्रेस 100 जागांवर आघाडीवर; कार्यकर्त्याने आनंदाने राहुल गांधींना मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल (Watch)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पक्षाच्या एका समर्थकाची भेट घेतली आणि संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्याने आनंदाने राहुल गांधींना मिठी मारली.
Congress Worker Hugs Rahul Gandhi: लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांवर मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडमध्ये भाजप बहुमतापासून दूर आहे. त्यांना अनेक महत्वाच्या ठिकाणी नुकसान होताना दिसत आहे. दुसरीकडे कॉंग्रेस भाजपला तगडी स्पर्धा देताना दिसत आहे. साधारण 100 जागांवर कॉंग्रेस पक्ष आघाडीवर असताना दिसत आहे. अशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पक्षाच्या एका समर्थकाची भेट घेतली आणि संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्याने आनंदाने राहुल गांधींना मिठी मारली. सध्या हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हातामध्ये कॉंग्रेस पक्षाचा झेंडा घेतलेला एक कार्यकर्ता बॅरिकेट ओलांडून राहुल गांधीकडे जातो आणि त्यांना आनंदाने मिठी मारतो. (हेही वाचा: Varanasi Election Result 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी 1 लाख मतांनी आघाडीवर, काँग्रेस उमेदवार अजय राय पिछाडीवर)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)