Rahul Gandhi at Mahakaleshwar Temple: भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान आज राहुल गांधी पोहचले महाकालेश्वर मंदिरामध्ये (Watch Video)
भारत जोडो न्याय यात्रा निमित्त सध्या राहुल गांधी मणिपूर ते महाराष्ट्र असा प्रवास करत आहेत. 20 मार्चला मुंबई मध्ये त्याची सांगता होणार आहे.
भारत जोडो न्याय यात्राच्या आज 52 व्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतले आहे. उज्जैन हे एकमेव असं शहर आहे जे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रांमध्ये समाविष्ट होते. 29 नोव्हेंबर 2022 मध्येही भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधींनी महाकालेश्वराचे दर्शन घेतले होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)