Coldplay India Concert Row: दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस; कोल्ड्प्लेसारख्या कॉन्सर्ट तिकिटांच्या अनधिकृत विक्रीच्या मुद्द्यावर मागितले उत्तर

भारतातील अशा कॉन्सर्टच्या कथित बेकायदेशीर आणि अनधिकृत तिकीट विक्रीमध्ये गुंतलेल्या, बेकायदेशीर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी याचिकेत आहे.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

Court Notice to Centre on Unethical Show Ticket Re-Sales: अधिकृत प्लॅटफॉर्मद्वारे कॉन्सर्ट तिकिटांची विक्री होणे आणि त्यांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी, नियामक फ्रेमवर्क तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राचा प्रतिसाद मागितला. मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने या याचिकेवर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि खाजगी कंपन्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत चार आठवड्यांत उत्तर दाखल करावे लागेल, असे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर याच याचिकेवर सुनावणी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली.

भारतातील अशा कॉन्सर्टच्या कथित बेकायदेशीर आणि अनधिकृत तिकीट विक्रीमध्ये गुंतलेल्या, बेकायदेशीर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी याचिकेत आहे. याशी याचिकाकर्त्या समृद्धी आणि इतर चार जणांनी, ज्येष्ठ वकील राजशेखर राव आणि अधिवक्ता मलाक भट्ट यांच्यामार्फत ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेच्या आगामी मैफिलीचा हवाला दिला. याचिकेत म्हटले आहे की, बुकमायशो (BookMyShow) सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने, लोकांना सोयीस्कर डिजिटल उपाय प्रदान केले पाहिजेत आणि तिकिटांचा काळाबाजार आणि अनधिकृत विक्रीवर नियंत्रण ठेवण्यास मदत केली पाहिजे. (हेही वाचा: Coldplay Announces Retirement: चाहत्यांना धक्का! ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड 'कोल्डप्ले'ने केली निवृत्तीची घोषणा, 12 व्या अल्बमनंतर थांबवणार काम)

-Coldplay India Concert Row:

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif