CM Uddhav Thackeray On Ahmednagar Civil Hospital Fire Incident: अहमदनगर मध्ये रूग्णालयाच्या ICU वॉर्ड आग प्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदारंवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ही दुर्घटना आज सकाळी 11च्या सुमारास घडली आहे. आग ही शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

अहमदनगर मध्ये सिव्हिल रूग्णालयाच्या ICU वॉर्ड मध्ये लागलेल्या आगीत 10 कोरोना बाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून या दुर्गघटनेबाबत सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.तसेच या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

CMO Maharashtra ट्वीट

राजेश टोपे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement