New Delhi: विदेशातून आलेल्या महिलेकडे सापडली विदेशी चलनातील 28 लाख रुपयांची रक्कम, CISF ची कारवाई
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. CISF च्या अधिकाऱ्यांनी एका महिला प्रवाशाकडून तब्बल मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन जप्त केले आहे. हे चलन यूएस डॉलरमध्ये असून त्याची किंमत 35,200 US डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात सांगायचे तर हाच आगडा सुमारे 28 लाख रुपये इतका होतो.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. CISF च्या अधिकाऱ्यांनी एका महिला प्रवाशाकडून तब्बल मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन जप्त केले आहे. हे चलन यूएस डॉलरमध्ये असून त्याची किंमत 35,200 US डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात सांगायचे तर हाच आगडा सुमारे 28 लाख रुपये इतका होतो. सदर महिला हे चलन किमती बॅगेत लवून ठेवलेल्या कप्प्यातून घेऊन आली होती. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतले. कारवाईनंतर या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)