Chhattisgarh BJP Leader Murder: छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी भाजप नेते रतन दुबे यांची नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली हत्या

छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायणपूर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी भाजप नेते रतन दुबे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. भाजप नेते रतन दुबे यांच्या हत्येबाबत, बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. म्हणाले, "आज छत्तीसगडमधील दहशतवादग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात भाजपच्या एका नेत्याची (रतन दुबे) हत्या करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या सहभागाबाबत विचारले असता, आयजी म्हणाले की एक टीम. घटनास्थळी पाठवण्यात आले असून तपासानंतर या संदर्भात काहीही स्पष्ट होईल". छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now