Chandigarh Girls Hostel MMS: चंदिगड विद्यापीठात एमएमएस कांड, 60 मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल, तीव्र आंदोलनानंतर महिला आरोपी ताब्यात

हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलने सुरु केली आहेत. दरम्यान, या घटनेवरुन विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत विद्यार्थी निदर्शने करताना दिसत आहेत.

चंदिगडविद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थीनिंचे अंघोळ करतानाचे बाथरुममधील व्हिडिओ कोणीतरी गुप्तपने चित्रीत करुन ते लिक केले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलने सुरु केली आहेत. दरम्यान, या घटनेवरुन विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत विद्यार्थी निदर्शने करताना दिसत आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून अटकाव केला जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, एका मुलीने आंदोलनादरम्यान कॅम्पसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणात एका महिला आरोपाला अटक झाल्याचे वृत्त आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)