Manipur viral video case मध्ये CBI कडून FIR दाखल

मणिपूर मधील महिलांच्या नग्न धिंडेच्या वायरल व्हिडीओमध्ये आता सीबीआय तपास करणार आहे.

CBI | Twitter

मणिपूर हिंसाचारानंतर पुन्हा चर्चेत आलं ते तेथील दोन महिन्यांपूर्वीच्या वायरल झालेल्या व्हिडिओमुळे. या व्हिडिओमध्ये महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 26 सेकंदाची एक  क्लिप वायरल झाली आहे त्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला. आता सीबीआय कडूनही या वायरल व्हीडिओ प्रकरणात FIR नोंदवण्यात आला आहे. मणिपूर वरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. सरकार, पंतप्रधान यावर संसदेत चर्चा करत नसल्याने त्यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. नक्की वाचा: Manipur Violence: मणिपूरमध्ये सामूहिक बलात्काराची आणखी एक घटना समोर, FIR दाखल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)