Car Falls In Waterfall Video: इंदोरच्या सिमरोल परिसरात कार थेट तलावात पडली; व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले 3 जणांचे प्राण (Watch)
या घटनेमागे कुटुंबातील वडिलांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. हँडब्रेक न लावता त्यांनी आपली कार तलावाजवळ उभी केली होती. या अपघातात वडील आणि मुलगी जखमी झाले आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूरजवळील सिमरोल येथे एक कार धबधब्याजवळील पाण्याने पडल्याची धक्कादायक घटना घडली. महत्वाचे म्हणजे त्यावेळी कारमध्ये तीन जण बसले होते. ही कार वरून थेट पाण्यात पडली. घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने पाण्यात उडी मारून या लोकांचे जीव वाचवले. सध्या या अपघातात व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमागे कुटुंबातील वडिलांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. हँडब्रेक न लावता त्यांनी आपली कार तलावाजवळ उभी केली होती. या अपघातात वडील आणि मुलगी जखमी झाले आहेत. त्यांना इंदूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. गाडी पाण्यात बुडताना पाहून इंदूर येथे राहणाऱ्या सुमित मॅथ्यू याने सर्वप्रथम पाण्यात उडी मारली, त्यानंतर सुमितच्या मागे आणखी दोन तरुणही मदतीला धावले. (हेही वाचा: Viral Video: चीनमध्ये मुसळधार पाऊस! भरधाव वेगात आलेली SUV कोसळली खड्ड्यात, Watch)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)