Budget Session 2023: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला! 31 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार
संसदेचं अर्थसंकल्पिय अधिवेशन 31 जानेवारी पासून सुरु होणार आहे.
यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार असुन मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. संसदेचं अर्थसंकल्पिय अधिवेशन 31 जानेवारी पासून सुरु होणार आहे. संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत या संबंधीत माहिती दिली आहे.