भारत-पाक सीमा चुकून ओलांडून आलेलं 3 वर्षाचं बाळ BSF ने केलं सुखरूप Pakistani Rangers च्या स्वाधीन

पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान मधून 3 वर्षीय मुलगा चुकून सीमा पार करून आला होता पण बीएसएफ कडून त्याला पाकिस्तानी रेंजर्स कडे पुन्हा देण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान मधून 3 वर्षीय मुलगा चुकून सीमा पार करून आला होता पण बीएसएफ कडून त्याला पाकिस्तानी रेंजर्स कडे पुन्हा देण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. शुक्रवारी Ferozepur sector मध्ये संध्याकाळी 7 च्या सुमारास हा प्रकार घडला. बाळ रडत असल्याचा आवाज बीएसएफ जवानांनी ऐकला. त्यावेळी त्यांनी बाळाच्या वडिलांच्या उपस्थितीत त्याला पाकिस्तानी रेंजर्स कडे सोपवण्यात आले.