BJP Sthapana Diwas: भाजप उद्या साजरा करत आहे पक्षाचा 43वा स्थापना दिवस; सकाळी 10 वाजता PM Narendra Modi करणार कार्यकर्त्यांना संबोधित
देशातील 10 लाख 56 हजार 2 बूथवरील भाजपचे बूथ कार्यकर्ते सकाळी 9.15 वाजता आपापल्या घरी ध्वजारोहण करून पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करतील.
भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली होती. आता उद्या, गुरुवारी पक्षाचा 43 वा स्थापना दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने गुरुवारी देशभरात 10 लाख 72 हजार 945 ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्ते भिंतींवर ‘पुन्हा एकदा मोदी सरकार, पुन्हा एकदा भाजप सरकार’, असे लिहिताना दिसणार आहेत. स्थापना दिनाशी संबंधित कार्यक्रम गुरुवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 9.15 वाजता भाजप मुख्यालय येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरू होतील. त्याचवेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देशभरातील आपापल्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करतील.
देशातील 10 लाख 56 हजार 2 बूथवरील भाजपचे बूथ कार्यकर्ते सकाळी 9.15 वाजता आपापल्या घरी ध्वजारोहण करून पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता देशातील 10 लाख 72 हजार 945 ठिकाणी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील.