JP Nadda On BJP Win: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा इंडिया युतीवर टीका, जातीवाद आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप, (Watch Video)
भाजपने तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या असून जनतेने काँग्रेस सरकारला नाकारल्याचे दिसून आले आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने जाताना दिसत असून या निवडणुकीत भाजपने तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या असून जनतेने काँग्रेस सरकारला नाकारल्याचे दिसून आले आहे. राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये. या विजयानंतर दिल्लीतील पक्ष कार्यालयात देशातील जनतेला संबोधित करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विरोधकांवर जातीवाद पसरवण्याचा, देशाचे विभाजन करण्याचा आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा - PM Narendra Modi On BJP Win: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींने फुंकले लोकसभा निवडणूकाचे रणशिंग)
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)