Winter Session of Parliament 2023: लोकसभेमध्ये भाजपा खासदारांनी दिल्या PM Narendra Modi यांच्या उपस्थितीत 'तिसरी बार मोदी सरकार' च्या घोषणा (Watch Video)
आजचा विजय हा 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी असल्याची प्रतिक्रिया काल नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली होती.
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. काल भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीमध्ये घवघवीत यश मिळालं आहे. या यशानंतर देशभर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. लोकसभेतही आज कामकाज सुरू होताच भाजपा खासदारांनी 'तिसरी बार मोदी सरकार' आणि 'बार बार मोदी सरकार' च्या घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी, सोबत त्यांच्या कॅबिनेट मधील राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह देखील उपस्थित होते. नक्की वाचा: PM Narendra Modi On BJP Win: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींने फुंकले लोकसभा निवडणूकाचे रणशिंग.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)